धक्कादायक! आता ‘ह्या’ कारागृहात घुसला कोरोना ; ‘इतके’ कैदी बाधित

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढत चालले आहे. आता कोरोना कारागृहात देखील दाखल झाला आहे. जिल्ह्यातील अनेक कारागृहातील कैद्यांना कोरोना झाला आहे.

आता पाथर्डी तालुक्यातील कारागृहातील कैद्यांनाही कोरोना झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. काल शहरासह तालुक्यात १४ लोक कोरोना पॉझिटिव्ह निघाले.

यापैकी पाथर्डी पोलीस ठाण्यातील विविध गुन्ह्यांत जेलमध्ये असलेल्या ६ कैद्यांना करोनाची लागण झाली आहे. यामुळे चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

शुक्रवारी दिवसभरात माणिकदौंडी येथील ६, टाकळी मानूर १, मालेवाडी १ या भागातील ८ रुग्ण तर पोलीस ठाण्यातील ६ आरोपी असे एकूण १४ रुग्ण बाधित असल्याचे आढळून आले आहे.

तर दिवसभरात शहर व तालुक्यातील ५५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढताना दिसत आहे.

जिल्ह्यात १२ हजार २६० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यापैकी ८ हजार ९९३ रुग्ण बरे होऊन परतले आहेत. सध्या ३ हजार ११४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर १५३ मृत्यू झाले आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment