Ahmednagar NewsBreakingMaharashtra

गोदावरीमध्ये 17 हजार क्युसेकने पाणी; जायकवाडी ‘इतके’ भरले

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- मान्सूनने महाराष्ट्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. गंगापूर, दारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरधार सुरु आहे. त्यामुळे धारणांत पाणीसाठ्यात आवक वाढली आहे.

दारणात 696 दलघफू नविन पाणी दाखल झाले. दिवसभर पाण्याची आवक सुरुच असल्याने दारणाचा विसर्ग 7958 क्युसेकवरुन 16238 क्युसेक करण्यात आला.

काल दिवसभरात दारणा, भावलीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या कधी मुसळधार तर कधी हलक्या सरी बरसत होत्या. हे पाणी खाली नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात दाखल होत असल्याने काल सायंकाळी 7 वाजता गोदावरीतील विसर्ग 14234 इतका होता.

दारणाचे पाणी दाखल झाल्यानंतर हा विसर्ग 17000 क्युसेकच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. इगतपूरी तालुक्यातील भावली, दारणा पाठोपाठ भाम धरणही 100 टक्के भरले आहे. त्यामुळे गोदापात्रातील जायकवाडीच्या दिशेने पाण्याचा वेग वाढत आहे.

काल सकाळी 6 पर्यंत गोदावरीतुन जायकवाडीच्या दिशेने सव्वासात टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.  जायकवाडी जलाशयात शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता 24 हजार क्युसेकने नविन पाण्याची आवक होत होती. या धरणात 61.54 टक्के पाणी साठा होता.

उपयुक्तसाठा 47.19 टिएमसी तर मृतसह एकूण साठा 73.26 टिएमसी इतका झाला होता. या धरणासाठी मेंढेगिरी समिती प्रमाणे आता या धरणात 3 टिएमसी पाण्याची गरज आहे. त्यानंतर या धरणात पाणी सोडण्याची गरज पडणार नाही.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button