अहमदनगर ब्रेकिंग : आज सकाळी वाढले ४७ नवे रुग्ण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्ण संख्येने द्दहा हजारांचा टप्पा ओलांडला.आज ५७६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता १००८१ इतकी झाली आहे. 

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७८.०५ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (शनिवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४७ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २६८२ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २७,  पाथर्डी ०३,  नगर ग्रा. १०, श्रीरामपूर ०१, कॅन्टोन्मेंट ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज एकूण ५७६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये मनपा २५३ संगमनेर ३८, राहाता २७, पाथर्डी ४८,, नगर ग्रा. ३४, श्रीरामपूर ०६,  कॅन्टोन्मेंट २७, नेवासा २२, श्रीगोंदा २१, पारनेर २७, अकोले ०५, राहुरी ११, शेवगाव ११, कोपरगाव ०५, जामखेड १२, कर्जत २६ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या: १००८१
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:२६८२
  • मृत्यू :१५३
  • एकूण रूग्ण संख्या:१२९१६

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment