…अन त्याने केले ‘असे’ काही की, लोक म्हणाले ‘हाच खरा कोव्हीड योद्धा!’

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके आता कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे. नेवासे तालुक्यातील अनेक गावात कोरोनाचे रुग्ण आहेत.

शहरात कोरोनाच्या रुग्ण संख्येने शंभरी गाठली आहे. अशा परिस्थितीमध्ये नेवासे फाटा येथील कोव्हीड सेंटरमधील तिसऱ्या मजल्यावरील विजेची नादुरुस्ती झाली.

कोरोनाचे पेशंट आणि कोरोनाची अशी भयावह परिस्थिती असतानाही तेथे कोणी जाण्यास धजावत नसताना रमेश तवले यांनी त्या ठिकाणी जाऊन विजेची दुरुस्ती करून दिली.

आणि सर्वांच्या तोंडून उद्गार बाहेर पडले, हाच खरा कोरोना योध्या! आज कोव्हीड सेंटरच्या 3 ऱ्या मजल्यावर विजेचा नादुरुस्ती झाली होती

या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याने कोणी जाण्यास धजावत नव्हते मात्र वायरमन तवले यांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा व सहाय्यक

अभियंता मनोहर पाटील नेवासा शहर महावितरण यांच्या आदेशावरून PPE kit परिधान करून लाईट सुरू केली. त्यांच्या मदतीला ढाकणे, मते, मतकर नगरपंचायत कर्मचारी होते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment