पारनेरच्या भूमिपुत्राला पोलीस दलातील सर्वोच्च सन्मान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :-  स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गृह विभागाने पोलीस शौर्य, गुणवत्तापूर्वक सेवा आणि राष्ट्रपती पदके जाहीर केली आहेत. यात महाराष्ट्र पोलीस दलाने ५८ पदके पटकावली आहेत.

पोलीस दलातील सर्वोच्च सन्मानाचे समजले जाणारे राष्ट्रपती पदक पारनेरच्या भूमिपुत्राला बहाल करण्यात आहे . तालुक्यातील लोणी हवेली

येथील भूमिपुत्र व सध्या नाशिक येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत असणारे डॉ. सिताराम शंकर कोल्हे यांना बहुमान मिळाला आहे.

राज्य स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून 1992 साली पोलीस दलात दाखल झालेल्या डॉ.कोल्हे यांनी पीएसआय, उपनिरीक्षक ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशा पदांवर काम केले आहे.

28 वर्षांच्या नोकरीच्या कारकिर्दीत त्यांना विविध सहाशे बक्षिसे तसेच 85 प्रशस्तिपत्रके आणि पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळालेले आहे.

डॉ.कोल्हे यांनी खून दरोडे तसेच आर्थिक घोटाळे उघडकीस आणून त्या गुन्हयांचा सखोल तपास केल्याने अशा गुन्ह्यातील गुन्हेगारांना जन्मठेप व सक्तमजुरी सारख्या शिक्षा ठोठावण्यात आल्या आहेत.

त्यांच्या या कार्याची दखल घेऊन आज त्यांना स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती पदक बहाल करण्यात आले आहे. याबद्दल लोणी हवेली ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.

दरम्यान, शौर्य पदकात जम्मू-काश्मीर पोलिसांना एकूण ८१ तर केंद्रीय राखीव पोलीस दलास ५५ पदके जाहीर झाली आहेत. ९२६ पदके जाहीर करण्यात आली.

त्यात शौर्य पदके, विशेष सेवा व इतर पदकांचा यात समावेश आहे. उत्तर प्रदेश पोलिसांना २३ शौर्य पदके मिळाली असून दिल्ली पोलिसांना १६,

झारखंड १२ या प्रमाणे पदके मिळाली आहे. ५५ शौर्यपदकांपैकी ४१ जम्मू-काश्मीरला, १४ नक्षलविरोधी कारवायांसाठी छत्तीसगडला मिळाली आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment