पार्थच झालं, आता आ.रोहित पवारांनी केली ‘अशी’ मागणी..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :-  अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. या मागणीवर खा. शरद पवार यांनी ‘माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही.

तो अप्रगल्भ आहे.’ असे म्हणत फटकारले होते. आता हे वातावरण कुठे शांत होते ना होते तोच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नवी मागणी केली आहे.

राज्यातील मंदिरं आणि धार्मिस्थळं सुरू करा, अशी मागणी रोहीत पवार यांनी केली आहे. पर्युषण पर्व काळात मंदिरं खुली करण्याची याचिका जैन समुदायाकडून कोर्टात सादर करण्यात आली होती.

त्यावर राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रं सादर करून मंदिरं खुली करता येणार नसल्याचं म्हटलेलं असतानाच रोहीत पवार यांनी मंदिरे खुली करण्याची मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

रोहित पवार यांनी ट्विटरवरून ही मागणी केली आहे. मंदिरं आणि धार्मिकस्थळं लोकांसाठी सुरू व्हावीत असं माझंही म्हणणं आहे.

त्यावर परिसरातील अनेक व्यावसायिकांची रोजीरोटी अवलंबून आहे. शिवाय लोकांच्या धार्मिक भावनाही असतात. त्याबाबत मी जरूर पाठपुरावा करेन, असं रोहित यांनी म्हटलं आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment