Ahmednagar News

सुखद! मुळा धरण ‘इतके’ भरले

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- सध्या मान्सूनने अहमदनगरमधील पाणलोट क्षेत्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसाने अनेक जलसाठे भरण्याच्या मार्गाकडे आहेत. 

पाण्याची आवक सुरु असल्याने नगर जिल्ह्यासाठी वरदान असणारे मुळा, भंडारदरा, निळवंडे धरणामध्ये पाण्याची आवक वाढत चालली आहे. मुळा धरण क्षेत्रात सततच्या पावसाने धरणात पाण्याची आवक सुरूच आहे.

मुळा धरणात आज सकाळी २४ तासात नव्याने एक टीएमसी पाणी जमा झाले आहे. आता धरणाचा पाणीसाठा आता १७ हजार ७३६ दशलक्ष घनफूट इतका झाला आहे.

मुळा धरण 68 टक्के भरले असून कोतुळ येथून मुळा नदीतून पाण्याची १० हजार क्यूसेकने आवक सध्या सुरु आहे. तसेच पाण्याची आवक सुरु असल्याने

नगर जिल्ह्यासाठी वरदान असणाऱ्या भंडारदरा धरणात आज सकाळी (१६ आॅगस्ट) ६ वाजता १० हजार ३६६ दशलक्ष घनफूट झाला होता.

यामुळे धरण तांत्रिकदृष्ट्या भरले असल्याची पाटबंधारे असल्याचे कार्यकारी उपअभियंता अभिजित देशमुख यांनी जाहीर केले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close