‘ह्या’ तालुक्यात कोरोनाच्या बळींची संख्या ९ वर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके आता कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे. राहुरी तालुक्यातील अनेक गावात कोरोनाचे रुग्ण आहेत.

राहुरी तालुक्यात आज दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात वळण व वांबोरी येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या ९ इतकी झाली आहे.

तालुक्यात आज नव्याने आठ जण कोरोना बाधित आढळून आले. तालुक्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १३० इतकी झाली आहे.

आज बाधित आढळलेल्यामध्ये कोल्हार खुर्द येथील तीन तर वांबोरी येथील पाच जणांचा समावेश आहे. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढताना दिसत आहे.

रविवारी सकाळी आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात १२ हजार पेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यापैकी १० हजार ८१ रुग्ण बरे होऊन परतले आहेत. तर १५३ मृत्यू झाले आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment