चिंताजनक! ‘ह्या’ तालुक्यात वाढले आजपर्यंतपैकी सर्वाधिक रुग्ण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अकोले तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

अकोले तालुक्यात दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण वाढतच चालले आहे. काल सर्वाधिक बाधित रुग्ण अकोले तालुक्यात आढळून आले. सर्वाधिक अशा 22 रुग्णांची स्वातंत्र्य दिनी अकोल्यात नोंद झाली आहे.

तालुक्यातील रुग्ण संख्या 281 झाली आहे. काल आढळलेल्या २२ रुग्णांमध्ये शहरातील कारखाना रोड येथील 42 वर्षीय पुरुष, 71 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय तरुण, 12 वर्षीय युवती, मनोहरपूर येथील 40 वर्षीय पुरुष, 13 वर्षीय तरुण, 3

4 वर्षीय महीला, हिवरगाव आंबरे येथील 51 वर्षीय पुरुष, 46 वर्षीय महिला, 8 वर्षीय मुलगा, कळस येथील 30 वर्षीय तरुण, देवठाण येथील 85 वर्षीय वृद्ध,व कोतुळ येथील 41 वर्षीय पुरूष, 23 वर्षीय पुरूष,

95 वर्षिय महीला, धामणगाव आवारी येथील 44 वर्षीय पुरूष, परखतपुर येथील 39 वर्षीय पुरूष, ब्राम्हणवाडा येथील 35 वर्षीय पुरुष व कोतुळ येथील 40 वर्षीय पुरुष,

शहरातील पोष्ट फिस जवळील 30 वर्षिय तरुण, कोतुळ येथील 41 वर्षीय पुरुष, व घोडसरवाडी (समशेरपुर) येथील 58 वर्षीय पुरूष आदींचा समावेश आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment