आरोग्यमंत्री टोपे म्हणतात, ‘शरद पवारांची देशाला गरज, त्यांची काळजी घेतली जातेय’

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- ‘शरद पवार हे महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण देशासाठी महत्त्वाचे आहेत. त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. आम्ही त्यांना नेहमीच काळजी घेण्याबद्दल सांगत असतो. पण त्यांचा उत्साह मोठा आहे.

लोकांच्या प्रती त्यांची बांधिलकी आहे. त्यातून ते लोकांमध्ये जात असतात. कदाचित फिरण्यातून त्यांना काही संदेश द्यायचे असतात.

त्यामुळे त्यांची अधिक काळजी घेण्याचा आमचा प्रयत्न आहे ‘ असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिपादन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर कोरोनाने एंट्री केली आहे.

येथील सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये सुरक्षा रक्षकांसह स्वयंपाक करणाऱ्या महिलेचा समावेश आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. पवार साहेबांच्या तब्येतीबद्दल राष्ट्रवादीच्या नेते, कार्यकर्त्यांकडून विचारणा होत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबद्दल आज माहिती दिली व वरील प्रतिपादन केले.

ते म्हणतात, ‘हे सगळे सुरक्षारक्षक लोकांना पवार साहेबांपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यातून ते काही लोकांच्या संपर्कात आले असण्याची शक्यता आहे.

मात्र, पवार साहेबांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली आहे. ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांची पूर्ण तपासणी करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती उत्तम आहे.

ते सुरक्षित व व्यवस्थित आहेत. त्यांची नीट काळजी घेतली जातेय,’ असं टोपे यांनी सांगितलं. दरम्यान, राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर काही काळ शरद पवार यांनी घरीच थांबणं पसंत केलं होतं.

मात्र अनलॉक प्रक्रिया सुरू होताच आणि राज्यातील कोरोनाचं संकट गडद होताच शरद पवार यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र निवासस्थानावरीलच काही व्यक्त कोरोनाबाधित झाल्यामुळे शरद पवार हे पुढील काही दिवस बैठका टाळतील, अशी शक्यता आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment