नगरमधील `या` बड्या नेत्याचे घरवापसीवर सूचक विधान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला रामराम करून भाजपवासी झालेल्या नेत्याची पुन्हा घरवापसी करण्याचा राष्ट्रवादीचा प्लॅन असल्याची सध्या चर्चा सुरु आहे.

त्यासंदर्भात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपध्ये गेलेले राष्ट्रवादीचे काही आमदार परत येणार असल्याचे सूचक विधान केले होते. त्या पार्श्वभूमीवर नगरमधील `हे` बडे नेते पुन्हा घरवापसी करणार अशी चर्चा होती. अकोलेचे माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र माजी आमदार वैभव पिचड यांचेही नाव या यादीत घेतले जात होते.

त्यावर ‘सध्या तरी आपण दिल्या घरी सुखी अहोत’ अशी प्रतिक्रिया वैभव पिचड यांनी दिली आहे. ज्येष्ठ नेते पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विश्वासू मानले जात होते. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांनी पुत्र वेभव यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला. निवडणुकीत वैभव यांचा पराभव झाला. मधल्या काळात पिचडांनी पवारांवर टीकाही केली होती.

मात्र, अलीकडेच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर टीका केल्यावर पिचड पिता-पुत्रांनी पवारांची बाजू घेतली होती. ‘शरद पवारांचं नेतृत्व मोठं आहे. ते कुणीही अमान्य करू शकत नाही,’ असं म्हणत पिचड यांनी भाजपच्या पडळकर यांनाच चुकीचे ठरविले होते. या पार्श्वभूमिवर जेव्हा घर वापसीची चर्चा झाली, तेव्हा पिचड यांचे नावही चर्चेत आले.

भंडारदरा धरण भरल्याने त्याच्या जलपूजनाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी वैभव पिचड यांना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी यासंबंधी विचारणा केली. पिचड म्हणाले, ‘काही वृत्तवाहिन्यांनी घरवापसीसंबंधीच्या बातम्या प्रसारित केल्या. त्यांच्या यादीत ते माझेही नाव घेत होते. मात्र असे काहीही नाही. माझा अद्याप कोणाशीही संपर्क झाला नाही.

सध्या तरी मी दिल्या घरी सुखी आहे, आम्ही राष्ट्रवादीत परत जाण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही,’ असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. विधानसभा निवडणुकीत अकोले मतदारसंघात भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले डॉ. किरण लहामटे विजयी झाले आहेत.

विधानसभा निवडणुकीचा प्रचार आणि त्यानंतरच्या काही काळात पिचडांनी पवारांवर टीका केली होती. तर प्रचाराच्यावेळी स्वत: पवार आणि अजित पवार यांनीही पिचडांवर टीका केली होती.

हळूहळू वातावरण बदल गेले. पडळकर प्रकरणाच्यावेळी स्वपक्षाची म्हणजे भाजपची नाराजी पत्कारून पवारांची बाजू जाहीरपणे लावून धरली होती. त्यामुळे त्यांच्या घरपावसीची चर्चा रंगली होती.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment