जिल्हा रुग्णालयातील कोरोना योद्धे गणेश बारवकर यांचे दु:खद निधन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :-  महाराष्ट्र औषध निर्माण अधिकारी संघटनेचे पदाधिकारी जिल्हा रुग्णालयातील औषधनिर्माते गणेश बारवकर यांचे नुकतेचे कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे दु:खद निधन झाले. मृत्यू समयी ते 40 वर्षांचे होते.

त्यांच्यावर अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. स्व.बारवकर यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ-बहिण असा परिवार आहे. स्व.बारवकर हे जिल्हा रुग्णालयातील औषध विभागात कार्यरत होते.

त्यांनी कोरोनोच्या प्रादुर्भावात सुरुवातीपासून दिवस-रात्र सेवा देत होते. कोरोना रुग्णांना औषधे पुरविण्यासाठी त्यांनी आपल्या जीवची पर्वा न करता सेवा दिली. अनेकांनी त्यांच्या या सेवेबद्दल कौतुक करुन आशिर्वादही दिले.

दुर्दैवाने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळेच त्यांचा अंत झाला याची सर्वांनीच हळहळ व्यक्त केली. या करोना योद्धाास जिल्हा रुग्णालय , अहमदनगर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

तसेच दिवंगत कोरोना योध्दा श्री बारवकर यांच्या कुटुंबीयांना आरोग्य विमा संरक्षण कवच योजने अंतर्गत रू.पन्नास लाख रुपयांची मदत मिळणेकामी शासनास प्रस्ताव सादर करण्यात यावा अशी विनंती वरिष्ठांना करण्यात आली.

तसेच महाराष्ट्रातील फार्मसिस्ट, फार्मसी ऑफिसर यांनीही स्व. बारवकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. ते कोरोना योद्धे होते, त्याच्याशी लढतांनाच त्यांना वीरगती प्राप्त झाली,

अशा शब्दात उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण करुन त्यांच्या कुटूंबियांच्या पाठिशी उभे सर्वोतोपरि मदत करण्याचे ठरविण्यात आले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment