शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत असताना शेतकऱ्याचे ‘कैवारी’ बोलत का नाहीत?

Published on -

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत असताना आघाडी सरकारमधील ‘जाणते राजे’ व शेतकऱ्याचे ‘कैवारी’ बोलत का नाहीत? असा सवाल आमदार राधाकृष्ण विखे यांनी उपस्थित केला.

मनोली येथील संकल्प दूध संस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करताना ते बोलत होते. पंचमहल दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रभाकर चौरे अध्यक्षस्थानी होते.

संस्थेचे संस्थापक मच्छिंद्र भागवत, जि. प. सदस्य रोहिणी निघुते, कैलास तांबे, दिलिप शिंदे, अप्पासाहेब बेद्रें, नितीन बेंद्रे, देविदास ठोसर, बबन भवर, नारायण शिंदे, देविदास शिंदे, दीपक शिंदे, राजू शिंदे,

संदीप बेंद्रे, संतोष भागवत यावेळी उपस्थित होते. विखे म्हणाले, दूधदराचा विषय घेत शेतकरी संघटना रोज सरकारला आंदोलनाचे इशारे देतात, पण त्यांचे आंदोलन कुठे दिसत नाही.

उसाच्या भावासाठी आंदोलन करणारे शेतकरी संघटनेचे नेते दूध उत्पादकांच्या प्रश्नावर आक्रमक होत नाहीत. अडचणीत सापडलेल्या दूध उत्पादकांना १० रूपये अनुदान द्या आणि प्रति लिटर ३० रुपये दर ठरवून द्यावा.

दूध उत्पादक रस्त्यावर उतरले, पण सरकारने जाणीपूर्वक दुर्लक्ष केले आहे. मंत्र्यांचेच दूध संघ असल्याने दर वाढवून देण्यासाठी त्यांचाच विरोध असल्याचे

आता लपून राहिले नाही. दूध उत्पादकांना न्याय देण्यात आता मंत्र्यांचीच आडचण होत असल्याचा खोचक टोला आमदार विखेंनी लगावला.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!