अहमदनगरचा ‘कोहिनूर’ही कोरोनाने हिरावला !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर शहरातील कोहिनूर वस्त्रदालनाचे संचालक प्रदिप वसंतलाल गांधी (वय ६५) यांचे आज मंगळवार १८ ऑगस्ट रोजी खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. 

काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती,   गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या मागे पत्नी, १ मुलगा, १ मुलगी असा परिवार आहे.

सुप्रसिद्ध कोहिनूर वस्त्रदालनाच्या निमित्ताने अहमदनगरचे नाव संपूर्ण राज्यात आणि राज्याबाहेर नेणारे कापड व्यावसायिक असलेले प्रदीपशेठ गांधी यांचे निधन धक्कादायक मानले जात आहे.

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून आता पर्यंत जिल्ह्यातील तब्बल १३६७० लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे, व १७४ जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे,आणि आज अहमदनगर चा कोहिनूर ही कोरोनाने हिरावला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment