कोहिनूर चे मालक श्री प्रदीप शेठ गांधी यांचे दुःखद निधन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर शहराच्या वैभवात भर घालणारे कोहिनूर चे मालक श्री प्रदीप शेठ गांधी यांचे दुःखद निधन झाले आहे. 

त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये चार दिवसांपासून उपचार चालू होते.दरम्यान उपचार चालू असतानाच आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.

अहमदनगर सह राज्यात प्रसिद्ध असणाऱ्या कोहिनूर ह्या वस्त्रदालनाचे ते मालक होते.या दालनाच्या माध्यमातून नगरच्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातही योगदान दिले. 

गरिबांच्या मदतीसाठी कोहिनूर ट्रस्ट या कौटुंबिक विश्वस्त संस्थेद्वारे गरिब रुग्णांना मदत तसेच शैक्षणिक मदतीचा पायंडा त्यांनी पाडला.

त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन नातू असा परिवार आहे.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment