अहमदनगर ब्रेकिंग : महिलेची आत्महत्या,ज्या ठिकाणी आत्महत्या केली त्याच परिसरामध्ये चालू होते ‘असे’ काही…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील गाडीलगाव येथील खानेबावस्ती येथे एका ३१ वर्षीय महिलेने राहत असलेल्या कोपीमध्ये बांबूला गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी पारनेर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

यशोदा काशिनाथ मधे वय ३१ यांनी स्कार्पने कोपीचे आड्याचे बांबूला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत पारनेर पोलीस स्टेशनला माहिती भाऊसाहेब यादव याने दिली.

त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली त्यानुसार पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान ही आत्महत्या कोपीमध्ये बांबूला गळफास घेऊन करण्यात आली, मात्र कोपीची उंची कमी असल्याने आत्महत्या कशी केली. आत्महत्या की घातपात पोलीस तपासात निष्पन्न होईल.

मात्र ज्या ठिकाणी आत्महत्या केली त्याच परिसरामध्ये मोठा पत्त्याचा डाव चालत असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत देखील आता चौकशी होईल.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment