कोपरगावमध्ये कोरोनाचे थैमान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :-  कोपरगावमध्ये कोरोनाचे थैमान सुरु आहे. दररोज बाधित पेशंटचे आकडे वाढत आहेत. शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचे पेशंट आढळत आहेत. मंगळवारी (दि.१८) 51 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला असून 61 व्यक्तींचे करोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोपरगाव शहरासह तालुक्यात सोमवारी (दि.17) सापडलेल्या 33 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 122 व्यक्तींची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. तसेच आज 19 रुग्ण करोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.

काल करोना बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर येथील 2, यशवंत चौक येथील 7, दत्त नगर येथील 4, टिळकनगर येथील 2, बँक रोड येथील 2, जुने पोष्ट ऑफिस येथील 1,खडकी येथील 1, सुभाषनगर येथील 1, टिळकनगर येथील 1, धारणगाव रोड येथील 2, सुभद्रानगर येथील 2,

विवेकानंद नगर येथील 3, तेरा बंगले येथील 1, सेवा निकेतन परिसरातील 2, गांधी नगर येथील 3, छ . शिवाजी महाराज रोड येथील 1, राम मंदिर परिसरातील 2 असे शहरातील 37 तर तालुक्यातील सुरेगाव येथील 1, खोपडी येथील 1, ब्राह्मणगाव येथील 3, कासली येथील 1, देर्डे चांदवड येथील 2, टाकळी येथील 2,

अंचलगाव येथील 3, जेऊर कुंभारी येथील 1 असे एकूण 51 रुग्ण आज दिवसभरात करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोपरगाव तालुक्यात दि. 18 ऑगस्ट पर्यंत एकूण 509 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून त्यातील 151 रुग्ण अ‍ॅॅक्टिव्ह आहेत तर आजपर्यंत एकूण 2 हजार 509 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. आतापर्यंत 8 व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment