डॅाक्टरच आढळला कोरोना बाधित

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून तालुक्यात व ग्रामीण भागांतही हा विषाणू मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. अकोले शहरात डॅाक्टरच कोरोना बाधित आढळले.

मंगळवारी तालुक्यात ११ कोरोना रूग्ण वाढले. त्यात हिवरगाव आंबरे गावचेच ८ रुग्ण आहेत. त्यामुळे ते हॅाटस्पॅाट बनले आहे. अकोले तालुक्यातील बाधितांची संख्या ३१२ झाली आहे.

संगमनेर येथील मालपाणी लॅान्स कोविड सेंटर येथील तपासणी अहवालात हिवरगाव आंबरे येथील ८, तर खासगी प्रयोगशाळेतील अहवालात शहरातील एका डॅाक्टरसह ३ जण पॅाझिटिव्ह आढळले.

खानापूर कोविड सेंटर येथे घेतलेल्या ४५ व्यक्तीच्या स्वॅबच्या तपासणीचा अहवाल नगर येथील शासकीय प्रयोगशाळेतून येणे बाकी आहे. उपचारांनंतर २१८ व्यक्ती कोरोनामुक्त झाले असून ८६ व्यक्तींवर उपचार सुरू आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment