गणेशोत्सवाबाबत आमदार संग्राम जगताप यांनी केली ही मागणी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :-गणेशोत्सवाची परंपरा खंडीत होऊ नये, यासाठी साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी काही अटी-शर्तींवर गणेश मंडळांना परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवावर प्रशासनाकडून निर्बंध आणण्याची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांची भेट घेऊन चर्चा केली.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळून साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. गणेश भक्तांच्या भावना लक्षात

घेऊन त्यांनी गणेश मुर्तीची स्थापना करण्यासाठी काही अटी-शर्तींवर परवानगी देण्याची मागणी आ. जगताप यांनी केली आहे.’

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment