जिल्ह्यात कोरोनाने आणखी दहा जणांचे बळी घेतले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :-  नगर शहर व जिल्ह्यात कोरोनाने आणखी दहा जणांचे बळी घेतले. त्यामुळे बळींची संख्या १९१ झाली आहे. दरम्यान, चोवीस तासांत जिल्ह्यात आणखी ६५० पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

नगर शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.०८ टक्के आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ३ हजार ७९ झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत ११९, अँटीजेन चाचणीत ३१४ आणि खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २१७ बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत मनपा ७९, पाथर्डी ३, नगर तालुका १७, कॅन्टोन्मेंट ५, नेवासे १, श्रीगोंदे ४, पारनेर ३, शेवगाव १ आणि मिलिटरी हॉस्पिटल ६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत मनपा ५४, संगमनेर १७, राहाता २२, पाथर्डी ११, नगर ग्रामीण ६०, श्रीरामपूर २९, कॅन्टोन्मेंट ८, नेवासे ७, श्रीगोंदे १६, पारनेर १३,

राहुरी ७, शेवगाव ७, कोपरगाव २२, जामखेड २८ आणि कर्जत १३ रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत मनपा १३१, संगमनेर १४,

राहाता ८, पाथर्डी ३, नगर ग्रामीण २०, श्रीरामपूर ८, कॅन्टोन्मेंट ५, नेवासे ४, पारनेर १६, अकोले ३, राहुरी ४, जामखेडमधील १ रुग्णाचा समावेश आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment