अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- शेतमालासाठी किसान रेल्वे दर शुक्रवारी नगरच्या रेल्वेस्थानकावर थांबणार आहे. दुपारी ३.३५ ला तिचे आगमन होईल. ही गाडी २१ ऑगस्टपासून कोल्हापूर येथून सुरू होणार अाहे.

मार्गावरील सर्व थांब्यांवर शेतमालाची लोडिंग, अनलोडिंग करण्याची परवानगी आहे. ही सेवा सुरूवातीला आठवड्यातून एकदा असेल.

कोल्हापूरहून मिरज, सांगोला, पंढरपूर, कुर्डुवाडी, दौंड आणि नगर या स्थानकांवर थांबेल. गाडीचे डब्बे गाडी क्रमांक ००१०७/००१०८ देवळाली-मुझफ्फरपूर-देवळाली गाडी मनमाड स्थानकावर जोडले व काढले जातील.

प्रयागराज चौकी, न्यू चौकी (अलाहाबाद चौकी), दीनदयाल उपाध्याय (मुगलसराय), बक्सर, दानापूर (पटणा) आणि मुझफ्फरपूर येथे माल पाठवता येईल.

किसान रेल गाडी क्र. ००१०९ कोल्हापूर ते मनमाड ही गाडी कोल्हापूरहून २१ ऑगस्ट – ते २५ सप्टेंबर (प्रत्येक शुक्रवारी ) सकाळी ५.३० वाजता प्रस्थान होईल

आणि गाडी क्र. ००११० मनमाड ते कोल्हापूर ही गाडी मनमाडहून २३ ऑगस्ट ते २७ सप्टेंबर (प्रत्येक सोमवारी) रात्री ८ वाजता प्रस्थान होईल.

किसान रेल पार्सल गाडी कोल्हापूर, मिरज, सांगोला, कुर्डुवाडी, दौंड, नगर स्थानकावर थांबेल. नगरला आगमन दुपारी ३.३५ व प्रस्थान ४.०५ होईल.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment