BreakingLifestyleMaharashtra

इंदोरीकर महाराजांना कोर्टाने दिली `ही` तारीख

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :-  विनोदी कीर्तनासाठी महाराष्ट्रभरात प्रसिद्ध असलेले निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी काहीदिवसापूर्वी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला होता.

लिंगभेदभाव करणारे विधान असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. यानंतर संगमनेर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर आज अतिरिक्त जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली आहे.

इंदोरीकर महाराजांच्या वतीने प्रथम वर्ग न्यायालयाच्या त्या हुकूमाविरुद्ध जिल्हा सत्र न्यायालयात रिव्हीजन अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर जिल्हा सत्र न्यायालयाने खालील कोर्टातील सुनावणीला स्थगिती दिली होती. सरकारी पक्ष्याच्या वतीने सरकारी वकील बी.जी.कोल्हे हजर झाले.

त्यांनी सरकार पक्षाचे म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयाकडे मुदत मागितली. यावर मा. न्यायालयाने त्यांना 16 सप्टेंबर 2020 पर्यंत म्हणणे मांडण्याची मुदत दिली आहे. तसेच या खटल्यात साक्षीदार असलेल्या रंजना गवांदे यांनी अर्ज दिला आहे की, आम्हाला या खटल्यात बाजू मांडण्याची संधी द्यावी.

दरम्यान, निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी कीर्तनातून प्रसूतीपूर्व गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याचा भंग केल्याने त्यांच्या विरुद्ध संगमनेर न्यायालयात दाखल झालेल्या फिर्यादीवर आज अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली.

आता पुढील सुनावणी दि. 16 सप्टेंबर 2020 रोजी जिल्हा सत्र न्यायालयात होणार आहे. साक्षीदार यांनी सदर खटल्या संदर्भात दिलेल्या अर्जावर इंदोरीकर महाराजांच्या वतीने हरकत घेणार आहोत, अशी माहिती इंदोरीकर महाराज यांचे वकील के. डी. धुमाळ यांनी दिली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button