अहमदनगर ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका जेष्ठ नेत्याने निधन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अहमदनगर जिल्हा सरचिटणीस सोमनाथ काशिनाथ धूत यांचे रात्री हृदयविकाराने निधन झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर होता. शरद पवार यांचे जुन्या सहकाऱ्यांपैकी ते एक होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अहमदनगर शहरासह जिल्ह्यात वाढविण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे.

त्यांनी पक्ष वाढवला; तसेच सर्वांना सोबत घेऊन चालायला शिकवणारा शरद पवार साहेबांचा विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविला.

अशा स्वच्छ हेतूने अविरत पक्ष वाढीचे काम ते करत राहिले. त्यांच्या पश्चात पत्नी सुचिता, मुलगी सौ. श्रद्धा झंवर व मुलगा गौरव धूत असा परिवार आहे.

दरम्यान आजच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर यांचेही कोरोना मुळे निधन झाले आहे.गाडळकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

त्यांच्या मागे आई- वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी भाऊ चार बहिणी असा परिवार आहे. आमदार संग्राम जगताप यांचे ते निकटवर्तीय कार्यकर्ते होते.

गाडळकर हे आ. संग्राम जगताप यांच्या अतिशय जवळचे व विश्‍वासू मित्र म्हणून ते सर्वपरिचित होते. त्यांना दिलेली जबाबदारी ते नेहमी वेळेवर पार पाडीत असे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यात कायम अग्रेसर भूमिका घेत असत.

…………………………………………………………………….
जाहिरात : व्यवसायाची सुवर्णसंधी – येवले अमृततुल्य या नामांकित चहाची सद्यस्थितीत तयार असलेली फ्रेंचायसी देणे ( विक्री ) साठी उपलब्ध आहे .
पत्ता :- प्रेम धन चौक महेंद्र पेढे वाला च्या समोर अहमदनगर
पहा फोटोज व लोकेशन पुढील लिंकवर https://bit.ly/3ggsEbn
फ्रेंचायसी साठी संपर्क :- आदि एन्टरप्रायजेस 9730197997, 9764855522, 9975167374
……………………………………………………………………….

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment