Ahmednagar NewsBreakingCorona Virus Marathi News

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हा उपाध्यक्षांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून रोज मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत व कोरोना मुळे मृत्यू होणार्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर यांचेही कोरोना मुळे निधन झाले आहे.गाडळकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

त्यांच्या मागे आई- वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी भाऊ चार बहिणी असा परिवार आहे. आमदार संग्राम जगताप यांचे ते निकटवर्तीय कार्यकर्ते होते.

गाडळकर हे आ. संग्राम जगताप यांच्या अतिशय जवळचे व विश्‍वासू मित्र म्हणून ते सर्वपरिचित होते. त्यांना दिलेली जबाबदारी ते नेहमी वेळेवर पार पाडीत असे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यात कायम अग्रेसर भूमिका घेत असत.

मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम व उत्सव नियमितपणे पार पाडत होते. सर्वांशी कायम हसत खेळत असणाऱ्या बाबासाहेबांचा मोठा मित्रपरिवार आहे. सर्वांच्या अडचणीस वेळेवर मदत करणारे अशी त्यांची ओळख होती.

त्यांच्या जाण्याने परिसरात व मित्र परिवारातून हळहळ व्यक्त होत आहे. बाबासाहेब गाडळकर यांची नगरसेवक होण्याची तीव्र इच्छा आ. संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोठ्यातून पूर्ण केली होती.

……………………………………………………………………..
जाहिरात : व्यवसायाची सुवर्णसंधी – येवले अमृततुल्य या नामांकित चहाची सद्यस्थितीत तयार असलेली फ्रेंचायसी देणे ( विक्री ) साठी उपलब्ध आहे .
पत्ता :- प्रेम धन चौक महेंद्र पेढे वाला च्या समोर अहमदनगर
पहा फोटोज व लोकेशन पुढील लिंकवर https://bit.ly/3ggsEbn
फ्रेंचायसी साठी संपर्क :- आदि एन्टरप्रायजेस 9730197997, 9764855522, 9975167374
……………………………………………………………………….
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button