Ahmednagar NewsGaneshotsav 2020

कोरोनाचा प्रादुर्भावामुळे यावर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव रद्द !

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गणेशोत्सव व मोहरम हे सण प्रतीकात्मक आणि साधे पणाने हे उत्सव घरगुती साजरे करावे आवाहन पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत केले आहे.

त्यांच्या आवाहनाला गणेश मंडळे व मोहरम मंडळे यांनी एकमुखी पाठींबा देऊन गणेशोत्सव व मोहरम हे सण सार्वजनिक करणार नसल्याचा जामखेडकरांनी निर्णय घेतला आहे तो निर्णय अभिनंदनीय असल्याचे गौरवोद्गार जिल्हा पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार यांनी केले.

……………………………………………………………………..
जाहिरात : व्यवसायाची सुवर्णसंधी – येवले अमृततुल्य या नामांकित चहाची सद्यस्थितीत तयार असलेली फ्रेंचायसी देणे ( विक्री ) साठी उपलब्ध आहे .
पत्ता :- प्रेम धन चौक महेंद्र पेढे वाला च्या समोर अहमदनगर
पहा फोटोज व लोकेशन पुढील लिंकवर https://bit.ly/3ggsEbn
फ्रेंचायसी साठी संपर्क :- आदि एन्टरप्रायजेस 9730197997, 9764855522, 9975167374
……………………………………………………………………….

गणेशोत्सव व मोहरमच्या पूर्वसंध्येला येथील महावीर मंगल कार्यालयात पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील गणेशोत्सव मंडळ व मोहरम मंडळ यांच्या यांची बैठक संपन्न झाली यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील,

प्रांताधिकारी अर्चना नष्टे, पोलीस उपअधीक्षक संजय सातव, तहसीलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, नगरपरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मिनिनाथ दंडवते, कार्यकारी उपअभियंता विजय परदेशी ,पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहायक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे,

राष्ट्रवादीचे नेते मधुकर राळेभात, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, डॉ. अरुण जाधव, रमेश आजबे, जयसिंग उगले, लहू शिंदे, सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, विवेक कुलकर्णी, बापू गायकवाड, सनी सदाफुले, तात्याराम पोकळे, मौलाना खालील, जावेद सय्यद, नासिर शेखसह जामखेड शहर व तालुक्यातील गणेश मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्ते,

मोहरम मंडळे, शांतता समिती सदस्य उपस्थित होते. यावेळी सर्व सामजिक कार्यकर्ते व गणेश मंडळांचे पदाधिकारी,तसेच मोहरम मंडळे व त्यांचे पदाधिकारी उपस्थित जामखेड करांनी गणेशोत्सव व मोहरम चे सार्वजनिक उत्सव साजरा करणार नसल्याचे यावेळी सांगितले

त्यामुळे अनेक वर्षाची परंपरा असलेले उत्सव कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरे करणार नाहीत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरी गणेशोत्सव मनोभावे व मोहरम देखील घरीच साजरे करणार

असल्याचे यावेळी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे हा जामखेडकरांनी घेतलेला निर्णय अभिनंदनीय असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी सांगितले,

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button