Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingCorona Virus Marathi NewsHealthMaharashtra

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज सकाळी वाढले ‘इतके’ रुग्ण, वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :-  जिल्ह्यात आज ४४५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्येने १३ हजारांचा टप्पा ओलांडला. 

आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ५४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८१.५८ टक्के इतके झाले आहे. 

दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९८ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २७३० इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६९, पाथर्डी ०१, नगर ग्रामीण ०२, कॅन्टोन्मेंट ०२, पारनेर ०६, राहुरी ०३, कोपरगाव ०६, जामखेड ०१, कर्जत ०१ आणि मिलीटरी ह़ॉस्पिटल ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ४४५ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा १८४, संगमनेर ३७, राहाता १७, पाथर्डी १७, नगर ग्रा.१३, श्रीरामपूर १७, कॅन्टोन्मेंट ०४, नेवासा २४, श्रीगोंदा ११, पारनेर २०, अकोले १६,  राहुरी ०७, शेवगाव २१, कोपरगाव २४, जामखेड १३, कर्जत २० अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या: १३०५४
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:२७३०
  • मृत्यू: २१९
  • एकूण रूग्ण संख्या:१६००३

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button