गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा : मंत्री थोरात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :- गणेशोत्सव सर्वांसाठी आनंद आणि उत्साहाचा सोहळा आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राज्यात लॉकडाऊन आहे. राज्यात ‘ मिशन बिगीन अगेन ‘ करण्यात आले असले तरी यापुढील काळात काळजी घेणे आवश्यक आहे.

सुरक्षा आणि स्वच्छतेला प्राधान्य देत यंदाचा गणेशोत्सव साधेपणानं साजरा करा. जागतिक कोरोना संकट टळू दे, पुन्हा एकदा जनजीवन गतिमान होऊ दे, अशी प्रार्थना गणरायाला करू, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

मंत्री थोरात म्हणाले, आज फक्त भारतापुढे नाही, तर जगासमोर कोरोनाचे संकट उभे आहे. स्वयंशिस्त आणि संयम दाखवित येणाऱ्या काळात सर्वांनी एकजुटीने परिस्थितीशी सामना करा. दरवर्षी अत्यंत उत्साह आणि आनंदाने गणेशोत्सव साजरा करतो. यंदा कोरोनामुळे खबरदारी घेण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

 

Leave a Comment