Ahmednagar News

शिवसेनेच्या तक्रारीची जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी घेतली दखल !

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :-  नगर जिल्ह्यातील खाजगी हॉस्पिटल्सच्या अवास्तव बिलावर आता भरारी पथकांची नजर असणार आहे. दस्तूर खुद्द जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी याबाबत आवाज उठवला होता . कोरोनाचा कहर वाढत आहे. हे पाहून बेड्स उपलब्ध नसल्याचे भासवले जात होते . बेड्स , व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा मग काळाबाजार करून अवास्तव पैसे हडपण्याचा संधी साधू पणा नगरची खाजगी रुग्णालये करीत होती .

याला आता चांगलाच चाप बसणार आहे. गिरीश जाधव यांनी केलेल्या तक्रारीची दखल जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या आरोग्य समितीने घेतली. आता जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर भरारी पथके नेमण्यात पथके वेळोवेळी छापा टाकून कोरोना बिलांची तपासणी करणार आहेत .

जी रुग्णालये शासनाने नेमून दिलेल्या प्रमाणे दर आकारणी करणार नाहीत त्यावर कारवाई करण्याची शिफारस हि पथके करणार आहेत . सर्वप्रथम शिवसेनेने ही बाब प्रश्नाच्या ध्यानात आणून दिली होती . कोरोना काळात बेफिकीर झालेल्या डॉक्टरांना तर शिवसेना स्टाईल आंदोलन करून धडा शिकवला जाईल असा इशारा गिरीश जाधव यांनी दिला होता .

हा इशारा देऊन १८ तासही उलटत नाही तोवर जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी हे आदेश दिले . त्यात त्यांनी म्हंटले आहे की, राज्यात साथरोग अधिनियम १८९७ हा दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करण्यात आला आहे. राज्यात कोरोना विषाणूचा (कोविड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यावर नियंत्रण आणण्यासाठी

आवश्यक उपाययोजना करणेकामी सक्षम अधिकारी म्हूणन जिल्हाधीकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे . ज्या अर्थी जिल्ह्यातील खाजगी रुग्णालये कोविड बाधित रुग्णाकडून किती शुल्क आकारतात व महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कसे उपचार करतात

याची तपासणी करण्यासाठी तालुका स्तरावर अधिकाऱ्यांचे भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील कोविड रुग्णालयामध्ये बाधित रुग्णाकडून बिलापोटी शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दर आकारल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत .

त्यामुळे आता यावर भरारी पथके नजर ठेवणार आहेत . तसेच एक लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची बिले हि भरारी पथके तपासतील. तपासणीअंती निश्चित होणारी रक्कम संबंधित रुग्णालयालाला अदा करण्यात येईल . याचा अहवाल तहसील दार तथा घटना व्यवस्थापक यांना देण्यात यावा असे संदर्भ क्रमांक १० नुसार नमूद करण्यात आले आहे.

भरारी पथकांनी केलेल्या कारवाईचा आढावा दर सोमवारी तहसीलदारांनी घ्यावा आणि अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा असे आदेश निगर्मित करण्यात आले आहेत . कोणतीही व्यक्ती , संस्था अथवा संघटनेने या आदेशाचा भंग केल्यास

ते साथरोग अधिनियम १८९७ मधील तरतुदीनुसार भारतीय दंड संहिता(६५ ऑफ १८६० )च्या कलम १८८ नुसार त्याला दंड होऊ शकतो . आणि कायदेशीर कारवाईला समोरे जावे लागते . त्यामुळे कोणीही याचा भंग करणार नाही अशी अपेक्षा करण्यात येते आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button