लाडक्या श्री विशाल गणेशाचे उत्साहात आगमन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर शहरातील लाडक्या श्री विशाल गणेशाचे आज उत्साहात आगमन झाले. अहमदनगर शहरात बाप्पांच्या आगमनाने उत्साहाचे वातावरण होते.

नगरचे ग्रामदैवत माळीवाडा येथील विशाल गणपती मंदिरात आज सकाळी मानाच्या गणेशाची जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या हस्ते विधीवत पूजा, अर्चा करुन श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली.

सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचे पालन करुन हा सोहळा पार पडला. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर, पंडिरतराव खरपुडे, अशोक कानडे यांच्यासह पदाधिकारी,

भाविक उपस्थित होते. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा नगरमधील गणेश मंडळांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

विशाल गणेश मंदिरात यंदा भाविकांंना प्रत्यक्ष दर्शन मिळणार नाही. परंतु दहा दिवस मंदिरात होणारे धार्मिक कार्यक्रम, आरती सोशल मीडियातून थेट पाहता येईल, असे देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे .

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment