पुरेसे प्रवाशी नसल्याने ‘लालपरी’ची लाॅकडाऊन अवस्था कायम !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :-  कोरोनाच्या विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे २२ मार्च पासुन एसटी बसेसचा प्रवास थांबला होता.

दरम्यान लाॅकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात २२ मे पासून जिल्हा अंतर्गत ठराविक तालुक्यासाठी एस.टी.महामंडळ प्रशासनाकडुन परवानगी देण्यात आली.

तारकपूर (नगर) आगाराची नाशिकला जाणारी एक व मनमाडकडून नगरला जाणाऱ्या एक बसचा अपवाद वगळता गुरुवारी राहुरी बसस्थानकावर जिल्हा बाहेर जाणाऱ्या बसेस फिरकल्या नाहीत.

पुरेसे प्रवाशी नसल्याने जिल्हा बाहेर जाणाऱ्या बसेसची २२ मार्चला सुरू झालेली लाॅकडाऊन अवस्था अद्यापही कायम आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्चपासून बंद असलेली

राज्य परिवहन महामंडळाची महाराष्ट्रापुरती मर्यादित जिल्ह्यात येण्याजाण्यासाठी एस.टी.बस सेवा पुर्ववत सुरू होण्याची घोषणा झाल्याने गुरुवारी सकाळपासुनच राहुरीच्या बस स्थानकावर बोटावर मोजण्याइतके प्रवाशी दाखल झाले होते.

तासाभराच्या प्रतीक्षेनंतर तारकपूर डेपोची बस नगर येथून एक प्रवाशाला घेऊन सकाळी १० वाजता राहुरी बस स्थानकावर दाखल झाली.

राहुरीतुन एक प्रवाशी मिळाल्याने अवघ्या २ प्रवाशांना घेऊन बस संगमनेर मार्गे नाशिक दिशेला रवाना झाली. तर मनमाडकडून नगरला जाणारी बस दुपारी पावणेदोन वाजता राहुरी बस स्थानकावर दाखल झाली.

या बसमध्ये प्रवाशी संख्या १२ होती. पुणे व इतर जिल्ह्यातील बसेस राहुरीत येणार ? ही चौकशी प्रवाशांनी बस स्थानकावर केली असता दुपारी अडीच वाजेपर्यंत एकही बस सुटली नसल्याची माहिती मिळाली.

लांब पल्ल्याच्या बसेस धावण्यासाठी डिझेल व इतर खर्चाची तूट भरून काढण्यासाठी किमान २० ते २२ प्रवाशांची महामंडळाला गरज आहे.

फिजिकल डिस्टन्सिंगचे बंधन पाळून एस. टी. बसेसची सेवा सुरू होत असली तरी पुरेसे प्रवाशी नसतील तर बसेस धावणार कशा ? हा सवाल प्रवाशांच्या चर्चे दरम्यान उपस्थित झाला.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment