राहुरीत कांद्याला मिळतोय ‘इतका’ भाव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :- राहुरी बाजार समितीच्या मोंढ्यावर १ नंबर गावरान कांद्याला शुक्रवारी १००० ते १५०० रुपये क्विंटलचा भाव मिळाला.

गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी राहुरीत कांद्याचे बाजारभाव क्विंटल मागे ३०० रुपयांनी घसरले. शुक्रवारी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यावर १६ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली होती.

राहुरी, श्रीरामपुर, वैजापूर, संगमनेर, कोपरगाव, नेवासे तालुक्यातील शेतकऱ्यांनी ांदा विक्रीसाठी आणला होता. शुक्रवारी मोंढ्यावर २ नंबर गावरान कांद्याला ७०० ते ११७५ रुपये क्विंटल,३ नंबर कांद्याला १०० ते ६५५ रुपये तर गोलटी

कांद्याला ७०० ते ११५० रुपये क्विंटलचा बाजारभाव मिळाला. राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीशी संलग्न असलेल्या वांबोरी उपबाजार समितीच्या मोंढ्यावर गुरूवारी १ नंबर गावरान कांद्याला १५०० ते १८०० रुपये क्विंटल,

२ नंबर गावरान कांद्याला ११०० ते १४९५ रुपये क्विंटल,३ नंबर कांद्याला २०० ते १०९५ रुपये क्विंटल तर गोलटी कांद्याला १००० ते १५०० रुपये क्विंटलचा बाजारभाव मिळाला होता. बाजार समितीच्या प्रवेशद्वारा जवळ असलेल्या राज्य मार्गावर कांदा घेऊन आलेल्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment