धक्कादायक : एकाच दिवसात कोरोनाने घेतले तब्बल २५ बळी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात २४ तासांत कोरोनाने आणखी २५ जणांचे बळी घेतले. त्यामुळे बळींची आजवरची संख्या २१८ झाली आहे. दरम्यान, आणखी ५७१ पॉझिटिव्ह आढळून आले असून, बाधितांची एकूण संख्या १५ हजार ८९९ झाली आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक बळी गेल्या २४ तासांत कोरोनाने घेतले. दोन आठवड्यांपूर्वी एका दिवसात २१ जणांचे बळी गेले होते. जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत १८४,

अँटीजेन चाचणीत २७९ आणि खासगी प्रयोगशाळेत १०८ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा १३४, राहाता १, पाथर्डी ३, नगर ग्रामीण ३२, कॅन्टोन्मेंट ३, नेवासे २, पारनेर ४, अकोले १, राहुरी १, कोपरगाव १, कर्जत १ रुग्णाचा समावेश आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment