Ahmednagar CityAhmednagar NewsBreakingCultureGaneshotsav 2020Maharashtra

श्रीविशाल गणेशाचेदर्शन आता फेसबूक, यू-ट्यूबवर

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :- नगरचे ग्रामदैवत श्रीविशाल गणेशाचे दर्शन आता मोबाइलवर फेसबुक, यू-ट्यूबद्वारे घेता येणार आहे. कोरोना काळात येत असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीविशाल गणपती देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी दिली. 

या लाइव्हसाठी वेगळा व्हिडीओ कॅमेरा अथवा मोबाइल वापरलेले नाहीत. मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणेचा उपयोग करण्यात आला आहे. लाइव्हसाठी वेगळा खर्च न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.कोणतेही मनुष्यबळ न वापरता या यंत्रणेद्वारे फक्त एका क्लिक वर हे लाईव्ह होणार आहे.

शनिवारी गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह व यांच्या पत्नी नलिनी सिंह यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या दिवशी सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत हे सीसीटीव्ही लाईव्ह फेसबुक य-ूट्युबवर दिसणार आहे. मंदिराबाहेर राजू ढोरे यांच्या सहकार्याने एलईडी वॉल लावण्यात आली आहे . त्यावरून देखील श्रींची मूर्ती व गाभाऱ्यातील धार्मिक कार्यक्रम प्रक्षेपित होणार आहेत.

रस्त्यावरून जाणाऱ्या भाविकांना याद्वारे दर्शनाचा लाभ मिळेल . जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत असल्याने मंदिरात गर्दी झाल्यास मोठा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे भाविकांना घरबसल्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी विश्वस्त मंडळाने श्रींचे दर्शन लाईव्ह करण्याचा निर्णय घेतला आहे. भाविकांनी मंदिराकडे दर्शनासाठी न येत मोबाइल किंवा कॉम्पुटरवरच फेसबुक, यू-ट्युब द्वारे दर्शन घ्यावे, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष अॅड. आगरकर यांनी केले आहे.

श्रीविशाल गणपती देवस्थान ट्रस्टच्या ऑफिशियल फेसबुक पेज वर तसेच यू-ट्यूब चॅनेलवर भाविकांना हे लाईव्ह दर्शन होणार आहे . देवस्थानचे फेसबुक पेज मराठीत विशाल गणपती देवस्थान ट्रस्ट , अहमदनगर हे आहे.गणेशोत्सव काळात इतर सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार नाहीत. मात्र दैनंदिन महा आरती, गणेश याग तसेच इतर धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

Fb Page Link – https://bit.ly/32d265P

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button