बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :-पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथे ढगे मळा येथे सायंकाळी 6.40 वाजेच्या सुमारास घरा शेजारील रस्त्यावरून आजी सोबत जात असणार्‍या पाच वर्षाच्या बालकावर बिबट्याने झडप घालून फरफटत ऊसाच्या शेतात नेले.

प्रसंगावधान दाखवत आजी बिबट्याच्या मागोमाग पळाल्याने तोंडात धरलेल्या बालकाला सोडून बिबट्याने पळ काढला. तो पर्यंत आसपासचे लोक जमा झाले होते. जखमी बालकाला उपचारासाठी तातडीने नगर येथे हलविण्यात आले.

जखमी झालेल्या बालकाचे नाव शौर्य उमेश भगत (वय 5 वर्षे) असे आहे. या घटनेने कासार पिंपळगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव परिसरात मागील काही दिवसापासून बिबट्याने अनेकांना दर्शन दिले आहे. याबाबत वनविभागाला कळविल्यानंतर काही दिवस या परिसरात पिंजरा लावण्यात आला होता.

मात्र मध्यंतरी बिबट्याचे दर्शन न झाल्याने वनविभागाने पिंजरा इतरत्र हलविला होता. मात्र आज शनिवारी सायंकाळी 6.40 वाजेच्या दरम्यान कासार पिंपळगाव ते हनुमान टाकळी रोडवर असणार्‍या

ढगे मळा येथे राहणार्‍या उमेश भगत यांच्या 5 वर्षाच्या शौर्य उमेश भगत याच्यावर बिबट्याने हल्ला करत जखमी केल्याच्या घटनेने भीती निर्माण झाली आहे.

 

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment