अभिमानास्पद कार्य : हिंदू मुलींच्या विवाहात त्यांच्या मागे उभा राहिला मुस्लिम मामा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- हिंदू आणि मुस्लिम या धर्मियांमधील ‘बंधुत्वा’चे नाते सांगणाऱ्या सकारात्मक घटनाही देशात घडत आहेत. बोधेगाव येथील बिकट परिस्थिती असलेल्या कुटुंबांतील दोन मुलींचे कन्यादान घरासमोर राहणाऱ्या आणि लहानपणापासून मामाची भूमिका बजावणाऱ्या बाबाभाई या मुस्लिम युवकाने केले. 

विशेष म्हणजे या मुस्लिम मामाने दोन्ही नववधू बहिणींचे कन्यादानही केले. ‘माणुसकीचा धर्म अन् धर्मापलिकडचं असलेलं हे लग्न’ पार पडण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

घरगुती अडचणींमुळे आई सविताने आपल्या गौरी व सावरी या दोन्ही मुली आणि करण या मुलाचे मोल मजुरी करून, लोकांची धुणी-भांडी करुन कष्टाने माहेर असलेल्या बोधेगावी संगोपन केले. मोठ्या मुलीला पदवी तर लहान मुलीस बारावीपर्यंत शिक्षण दिले.

दरम्यान,स्वतःचा भावाचे अकाली निधन झाल्याने सविताबाईंनी घरासमोर राहणाऱ्या बाबाभाई पठाण यांना आपला गुरु भाऊ मानत अडी-अडचणीत हक्काने मदत घेऊ लागली. रात्री-अपरात्री सुख-दुःखात भाऊ म्हणून तो कायम आपल्या बहिणीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला.

याच दरम्यान दोन्ही मुलींसाठी आपल्या सासरच्याच (मुंगी) येथील एकाच घरातील सोयरिक आली.हॉटेल व्यावसाय व स्टेशनरी दुकान चालवणाऱ्या या मुलांची पसंती होताच या १३ ऑगस्ट रोजी विवाहही पार पडला. बडेजाव न करता मोजक्याच उपस्थितीत हे लग्न लागले.

या लग्नाचा खर्च मुलीच्या आईने व गुरु भावाने (बाबाभाई) केला. विवाह सोहळयात भाऊ म्हणून बहिणींच्या मुलीचे लग्न विधीसाठी सख्ख्या मामाचे कर्तव्य बाबाभाईंनी पार पाडले.व दोघींचे कन्यादानही केले. आदर्श उदाहरण म्हणून हा विवाह सोहळा चर्चिला जात आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment