Ahmednagar News

अबब! जायकवाडी ‘एवढे’ भरले ; ‘गंगापूर’मधून पाण्याचा ‘इतक्या’ क्युसेकने विसर्ग

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- मान्सूनने महाराष्ट्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. गंगापूर, दारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची जोर ‘धार’ सुरु आहे. त्यामुळे धारणांत पाणीसाठ्यात आवक वाढली आहे.

दारणाच्याही पाणलोटातील इगतपुरी, घोटी तसेच भावली, भाम या धरणांच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. दिवसभरातील या पावसाने धरणांमध्ये नवीन पाण्याची चांगली आवक होणार आहे.

या पाण्याच्या आवकेमुळे गंगापूर धरण 94 टक्के भरले असून त्यातून सुरुवातीला 520 नंतर 1040 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे. दारणाच्या पाणलोटात पाऊस काल काहिसा मंदावला होता.

मात्र काल सकाळी 6 पर्यंत सपलेल्या मागील 24 तासांत दारणात 907 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. 92.54 टक्के पाणीसाठा स्थिर ठेऊन या धरणातून 10486 क्युसेकने विसर्ग सुरुच आहे.

नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरीतील विसर्ग 12620 क्युसेक इतका कायम आहे. गंगापूरचे पाणी दाखल झाल्यानंतर गोदावरीतील विसर्ग 13 हजार ते 13500 क्युसेक इतका रात्रीतून वाढू शकतो.

जायकवाडी धरण काल सायंकाळी 78 टक्क्यांवर पोहचले. काल सायंकाळी जायकवाडीत 16378 क्युसेकने नविन पाण्याची आवक होत होती. या जलाशयातील उपयुक्त साठा 59.8 टीएमसी (59881 दलघफू) इतका झाला होता.

तर मृतसह एकूण साठा 85.9 टीएमसी (85951 दलघफू) इतका झाला होता. हे धरण 78.09 टक्के इतके भरले होते. दारणाच्या पाणलोटातील घोटी, इगतपुरी परिसरात पावसाचा जोर मंदावला होता.

मात्र काल सकाळी संपलेल्या 24 तासांत दारणाच्या पाणलोटातील घोटीला 64, इगतपुरीला 89 तर दारणाच्या भिंतीजवळ 25 मिमी पावसाची नोंद झाली.

भावली धरणातुनही विसर्ग 701 क्युसेकने विसर्ग दारणाच्या दिशेने प्रवाहित होत असल्याने दारणात 907 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. यामुळे दारणातून 10486 क्युसेक ने विसर्ग सुरुच आहे.

* कोणत्या धरणांत किती पाणी? :- पालखेड 75.23 %, कडवा 100 %, मुकणे 69.45 %, भोजापूर 100 %, आळंदी 42.86 %, कश्यपी 53.56 %, वालदेवी 100 %, गौतमी गोदावरी 64.05 %, वाकी 64.50 %, भाम 100 %.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button