Ahmednagar NorthBreakingCrime

अहमदनगर ब्रेकिंग : तब्बल दोन वर्ष तरुणीवर घरात घुसून बलात्कार

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :-  अल्पवयीन मुलीवर आई वडिलांस जीवे मारण्याची धमकी देत व तब्बल दोन वर्ष एका नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना जिल्ह्यात घडली आहे.

नेवासा तालुक्यातील बकु पिंपळगाव परिसरात एका १८ वर्षांच्या मुलीला तिच्या घरात घुसून संमतीशिवाय बळजबरीने शारीरिक संबंध करुन बलात्कार केला.

अनेक दिवसापासून आरोपी सुभाष लहानु सोडनर, रा. बकु पिंपळगाव याने बळजबरीने संबंध करुन तरुणीस गर्भवती केले. कोणाला काही सांगितल्यास तिला व तिच्या आई व वडिलांस जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

काल याप्रकरणी पिडीत तरूणीने नेवासा पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी सुभाष लहानु सोडनर यांच्याविरुद्ध भादवि कलम ३७६, ३७६ (एन) ५०६, पोस्को कायदा कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

१८ वर्षाच्या तरुणी वर तब्बल दोन वर्षापासून हा नराधम आरोपी बालात्कार करत होता, दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सुभाष सोडनर याला अटक केली असून पुढील तपास नेवासा पोलीस करीत आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button