अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ५१९ रुग्ण वाढले एकूण रुग्ण संख्येने ओलांडला १७५८३ चा आकडा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ९६४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ७९.३७ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५१९ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३३८९ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ९१, अँटीजेन चाचणीत २८३ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १४५ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६१, संगमनेर ०१, पाथर्डी १२, नगर ग्रामीण ११, श्रीरामपूर ०१, कॅन्टोन्मेंट ०२, श्रीगोंदा ०१, पारनेर ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २८३ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ५८, संगमनेर १७, राहाता १५, पाथर्डी १७, श्रीरामपुर ०२, कॅंटोन्मेंट १६, नेवासा ११, श्रीगोंदा ३२, पारनेर ०८, अकोले २७, शेवगाव ०३, कोपरगाव ४०, जामखेड २३ आणि कर्जत १४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १४५ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ९३, संगमनेर ०४, राहाता ०५, पाथर्डी ०१, नगर ग्रामीण १४, श्रीरामपुर ०४, कॅंटोन्मेंट ०१, नेवासा ०२, पारनेर ०४, अकोले ०१, राहुरी ०६, कोपरगांव ०५, जामखेड ०४ आणि कर्जत ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ४८६ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा १७१, संगमनेर ३९, राहाता ३९, पाथर्डी २५, नगर ग्रा.२०, श्रीरामपूर ११, कॅन्टोन्मेंट २१, नेवासा १४, श्रीगोंदा १६, पारनेर २९, अकोले १३, राहुरी ०७, शेवगाव १०, कोपरगाव ३५, जामखेड २३,कर्जत ०८, मिलिटरी हॉस्पीटल ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या: १३९६४
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:३३८९
  • मृत्यू: २४०
  • एकूण रूग्ण संख्या:१७५८३

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment