`भविष्यात भाजप-शिवसेना एकत्र येतील` नगरमधील भाजप नेत्याचे मोठे विधान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :-  राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कामावर माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सातत्याने टीका करत आहेत. राज्याच्या राजकारणात त्यांच्या मताला महत्व आहे तसंच नगर जिल्ह्यात त्यांच्या भूमिकेला महत्व आहे. त्यामुळे विरोधक असले तरी त्यांना विखेंसोबतची मैत्रीत गरजेच्या वेळी फायदेशीर ठरते.

त्यामुळे एका उद्घाटननिमित्त एकत्र आलेल्या माजी मंत्री विखे आणि खा. लोखंडे यांच्या भेटीची चर्चा रंगली आहे. राहता पंचायत समिती कार्यालयाच्या उदघटन कार्यक्रमाचे शहरात आयोजन केले होते. यावेळी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी हजेरी लावली होती.

यावेळी बोलताना लोखंडे म्हणाले कि, विखे पाटील चांगले प्लॅनर आहेत. त्यांच्या या विधानानंतर विखे पाटील यांच्या डोक्यात नेमका काय प्लॅन असावा, असा प्रश्न उपस्थीतांना पडला. त्यानंतर विखे पाटील म्हणाले, तुम्ही युतीचे खासदार म्हणून निवडून गेलात.

आता महाविकास आघाडीचे खासदार झालात. हरकत नाही, कुणी सांगावे, आपली पुन्हा युतीदेखील होईल. त्यांच्या या विधानमुळे उपस्थितांच्या भुवया पुन्हा उंचावल्या. एकेकाळी भाजपवाशी असलेले सदाशिव लोखंडे शिवसेनेतून खासदार झाले तर शिवसेना, काँग्रेस आणि आता भाजप असा प्रवास माजी मंत्री राधाकृष्ण विखेंचा आहे.

दोघांनाही राजकारणातील बारकावे माहिती आहेत. कोविडमुळे अर्थकारण थंडावले, राजकारण नाही. एरवी फारसे एकत्र न येणारे हे दोन नेते अनपेक्षितपणे एकत्र आले. त्यामागे काही तरी राजकारण असणार. आजवरचा अनुभव पहाता विखे पाटील विनाकारण काहीही करीत नाहीत. अशी चर्चा रंगली आहे.

लोखंडे यांनी विखे पाटील यांच्या उल्लेख चांगले प्लॅनर असा केला. श्रीरामपूर नगर पालिकेची निवडणुक वर्षभरावर आली. त्यामुळे त्यांनी सोंगट्या टाकायला सुरवात केली नाही ? ना. लोखंडे यांचे या पालिकेच्या राजकारणात फारसे स्थान नाही. बोलणी करायची वेळ आली तर शिवसेनेपूरती त्यांची भुमिका महत्वाची ठरू शकते एवढेच.

विखे पाटील यांची श्रीरामपूर शहर व मतदारसंघावर बारीक नजर आहे. तेथे त्यांना एका दगडात दोन तीन पक्ष्यांची शिकार करायची आहे. अहोरात्र राजकारण हा विखे पाटील परिवाराचा स्थायीभाव आहे. एकाच वेळ अनेक आघाड्यावर लढाई सुरू ठेवण्याची क्षमता आणि ताकद त्यांच्याकडे आहे.

इकडे शिवसेनेचे लोखंडे त्यांच्या व्यासपिठावर येतात. त्यांनाही आपल्या चिरंजिवांना श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातून आमदार करण्याची इच्छा आहे. उद्या राज्यात खरोखरच राजकीय समीकरणे बदलली. तर विखे पाटील यांचा आधार कुणाला नको आहे.

असा व्यवहारी विचार करून त्यांनी कालच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले असणार. नाही म्हणायला, आम्ही विकासकामाच्या निमित्ताने एकत्र आलो. यात राजकारण नाही. असे सांगायला लोखंडे विसरले नाहीत.

 

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment