पारनेर तालुक्यात वाढले कोरोना पेशंट; आरोग्य अधिकारी सांगतात `हे` कारण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- राज्यात कोरोनाचे थैमान सुरु आहे. ऑगस्ट महिन्यापासून नगर जिल्ह्यात कोरोनाचे पेशंट मोठ्या संख्येने वाढत आहेत. यामध्ये पारनेर तालुक्यात पाच महिन्यात सुमारे 131 गावांपैकी 46 गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे.

मात्र, कोरोनावर मात करून मोठ्या संख्येने पेशंट सुखरूप घरी परतत असले तरी मृत्यू होणाऱ्या रूग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यातील या 46 गावात 632 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत. पैकी 461 रूग्णांनी कोरोनावर मात करत ते घरी पोहचले आहेत.

मात्र दुर्देवाने 15 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 156 रूग्णांवर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तालुक्यात सध्या एक महिन्यापासून आरोग्य विभागाने कोरोनाची रॅपीड टेस्टला सुरूवात केली. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे.

गेली काही दिवसांपासून सरासरी 20 ते 30 रूग्णांची नव्याने भर पडत आहे. तालुक्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 72.32 टक्के आहे. तर कोरोना रूग्णांचा मृत्यू दर फक्त फक्त 2.34 आहे. तसा तो खूपच कमी असल्याने लोकांनी काळजी घ्यावी.

केवळ घाबरून जाऊ नये, असे वैद्यकिय अधिकारी व प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. तसेच कोरोनाच्या रूग्णांमध्ये 66.61 टक्के पुरूष तर 33.39 टक्के महिला रूग्णांची संख्या आहे. तसेच तरूण 21 ते 40 वयोगटीतील रूग्णाची संख्या 261 आहे. त्या खालोखाल 41 ते 60 या वयोगटीतील रूग्णाची संख्या आहे.

याचा अर्थ तरूण वर्ग कामानिमित्ताने बाहेर पडत असल्याने किंवा काळजी घेत नसल्याने ही संख्या अधिक दिसत आहे. ऑगस्टपासून तालुक्यात रॅपीड टेस्ट सुरू झाल्याने रूग्ण संख्या वाढताना दिसत आहे. ती या पुर्वीही असणार आहे. मात्र तपासणी न झाल्याने ती उघड झाली नाही, असे वैद्यकिय अधिकारी सांगत आहेत.

कारण ज्या ठिकाणी कोरोनाबाधीत रूग्ण सापडतात. तेथे व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींच्या रॅपीड टेस्ट केल्या जातात, असी माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.

 

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment