माजी उपनगराध्यक्ष, माजी नगरसेवक व नगरसेविकेसह 12 जण पॉझिटिव्ह

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-  मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला.

त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. यात सामान्यांबरोबच अनेक राजकीय नेतेही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.

आता नव्याने श्रीरामपूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष, माजी नगरसेवक व नगरसेविकेसह 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

तर तालुक्यात घेण्यात आलेल्या रॅपीड टेस्टमध्ये तालुक्यात 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे श्रीरामपूर तालुक्याचा कोरोना रुग्णांचा आकडा 636 झाला आहे.

तालुक्यात आजपर्यत 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल पाझिटीव्ह निघालेल्या रुग्णांमध्ये वॉर्ड नं. एक़मध्ये 2, वॉर्ड नं. दोन – 5, वॉर्ड नं. सहा-2, वॉर्ड नं. सात-3, पंचायत समिती परिसर 2, टिळकनगर 1,

जिजामाता चौक 1, बेलापूर येथील 4 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान अहमदनगरमध्ये कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. वैद्यकीय सेवेवरही ताण वाढत आहे.

त्यामुळे सर्वतोपरी काळजी घेण्याचे आणि काटेकोरपणे नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment