`त्या` 16 पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात; जिल्हा पोलीस प्रमुखांनी केलं अभिनंदन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- काही दिवसांपूर्वी श्रीगोंदा येथे दंगल नियंत्रण पथकातील 16 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोना बाधित पोलिसांनी जिल्हा रुग्णालयत उपचार घेतले होते.

या सर्वांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्या कर्मचार्‍यांचे जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार सिंह यांनी अभिनंदन केले. यावेळी त्यांनी पोलिसांना सोशल डिस्टिन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केलं.

कोरोना वैश्‍विक महामारीवर आपण लवकरच विजय मिळवू, तसेच संपूर्ण जगही कोरोनाच्या विळख्यातून लवकरच मुक्त होईल, असा विश्‍वास जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार सिंह यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यात पोलीस प्रशासनातील कर्मचार्‍यांना योग्य सूचना दिल्या असून, सोशल डिस्टिन्सिंगबरोबरच इतर नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस प्रशासनातील दंगल नियंत्रण पथकातील 16 पुरुष व महिला कर्मचार्‍यांनी कोरोनावर मात केल्याबद्दल त्यांचे जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार सिंह यांनी अभिनंदन केले.

यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, नगर शहर उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस अधीक्षक (गृह) प्राजक्ता सोनवणे, भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहा.

पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, सहा. पोलीस निरीक्षक किरण शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी श्री. सिंह पोलीस कर्मचार्‍यांच्या कुटुंबातील सदस्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.

सिंह म्हणाले की, या पोलीस कर्मचार्‍यांवर जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून उपचार करण्यात आले आहेत. सर्व कोरोना यौद्धे जीवाची बाजी लावून कोरोनापासून नागरिकांना मुक्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. मास्कचा वापर न करणार्‍यांंवर कारवाई केली जात असून, सूचनांचे पालन न करणार्‍यांवर अधिक कठोर कारवाई करणार आहोत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment