अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण, वाचा आतापर्यंतचे अपडेट्स !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५६७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १४ हजार ५३१ इतकी झाली आहे. 

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८२.३५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५२ ने वाढ झाली.यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २८७३ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २५, पाथर्डी ०१, नगर ग्रामीण ०१, श्रीरामपूर ०५, पारनेर ०९, राहुरी ०१, जामखेड ०१आणि मिलिटरी हॉस्पीटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ५६७ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा २२१, संगमनेर ४७, राहाता ३०, पाथर्डी १६, नगर ग्रा.२६, श्रीरामपूर १६, कॅन्टोन्मेंट २३, नेवासा ०४, श्रीगोंदा ३१, पारनेर ३९, अकोले ०५, राहुरी ०१,

शेवगाव ०१, कोपरगाव ५५, जामखेड ३६, कर्जत ०९,  मिलिटरी हॉस्पीटल ०६, इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या: १४५३१
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:२८७३
  • मृत्यू: २४१
  • एकूण रूग्ण संख्या:१७६४५

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment