मोठी बातमी : जिल्ह्यातील ‘या’ शाळेची सीबीएसईची मान्यता काढण्याची नोटीस

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर शहराजवळील नामांकित सेंट मायकल स्कूलला शिक्षण विभागाने शाळेच्या मान्यतेचा प्रस्ताव नामंजूर करण्यासह शाळेला मिळालेले सीबीएसईसाठीचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याबाबत नोटीस पाठविण्यात आली आहे.

प्राथमिक शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी या शाळेच्या प्राचार्यांना पत्र देऊन याबाबत खुलासाही मागितला आहे. 25 टक्के प्रवेशात पात्र विद्यार्थ्यांना शाळा प्रवेश नाकारणे,

कामकाजात अनेक अनियमितता, शासकीय आदेशांचे उल्लंघन यामुळे शिक्षण विभागाने सदर कारवाई केली आहे. या शाळेच्या मान्यतेचा प्रस्ताव नामंजूर करण्यासह शाळेला मिळालेले सीबीएसईसाठीचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याचा

प्रस्ताव शासनाकडे का पाठवण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकार्‍यांनी शाळेस पाठवली आहे.

या पत्रात शिक्षणाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, शाळेने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क तरतुदींचे उल्लंघन केले आहे.

२०१६- १९ या तीन वर्षांत शाळेने आरटीईअंतर्गत द्यावयाच्या 25 टक्के मोफत प्रवेशासाठी पात्र विद्यार्थी असताना एकाही विद्यार्थ्यांस प्रवेश दिला नाही. 2019-20 मध्ये आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी 21 विद्यार्थी पात्र असताना

केवळ तिघांना प्रवेश दिला. त्यातही 2 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबत गटशिक्षणाधिकार्‍यांनी पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर प्रवेश देण्यात आला.

तसेच 2020-21 मध्ये 22 विद्यार्थी पात्र असताना प्रारंभी एकही प्रवेश दिला नाही. गटशिक्षणाधिकार्‍यांच्या सूचनेनंतर केवळ 2 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. तसेच आयोजित केलेल्या मुख्याध्यापकांच्या सहविचार सभेला सेंट

मायकलच्या प्राचार्या अनुपस्थित होत्या. या सर्व प्रकरणावरून शाळा आरटीई बाबत गंभीर नसल्याचे निदर्शनास येत आहे असे पत्रात म्हटले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment