खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नांना यश; `या` राष्ट्रीय महामार्गासाठी निधी मंजूर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-  नगर जिल्ह्यातील महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग असलेला अहमदनगर ते जामखेड या महामार्गाच्या कामाला मान्यता मिळाली आहे. या कामाकरिता केंद्र सरकारने 29 कोटी 14 लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे.

लवकरच या मार्गाच्या कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली आहे. खासदार विखे पाटील यांनी रस्त्याच्या कामाबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाला प्रस्ताव तयार करण्यासाठी सूचना केल्या

होत्या. या प्रस्तावास तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता मिळाल्याने या रस्त्याच्या कामासाठी 29 कोटी 14 लाख रुपयांचा निधी आता उपलब्ध होणार आहे.

अहमदनगर ते जामखेड हा 73 किलोमिटर लांबीचा रस्ता असून यापैकी 51 किलोमिटर चे काम मंजूर झाले आहे. पावसाळा संपल्यानंतर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता दिलीप तरटे यांनी सांगितले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment