अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : ‘या’ नेत्या विरोधात गुन्हा दाखल; बदनामी केल्याचा आरोप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- नगर शहरात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. दिवसेंदिवस शहरातील कोरोना पेशंटची वाढती संख्या आणि मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे.

जिल्हा प्रशासनाने काही खासगी हॉस्पिटलला कोरोना बाधित पेशंटवर उपचार करण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये साईदीप हॉस्पिटलचा समावेश आहे.

नगर शहरातील साईदीप हॉस्पिटलमध्ये दिल्या जाणार्‍या उपचारावर आणि औषधांवर आक्षेप घेत चुकीची माहिती फेसबुक आणि हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून पसरवत बदनामी केली आहे.

साईदीप हॉस्पिटलबाबत बदनामीकारक पोस्ट करणार्‍यांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नगर शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे.

खासगी रुग्णालयात उपचारासाठी बेड शिल्लक नाहीत. अशा काळातही खासगी रुग्णालयातील कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून रुग्णांवर उपचार करत आहेत.

असे असले तरी रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. मात्र या मृत्यूमागे केवळ कोरोना हे कारण नसल्याचे वैद्यकीय क्षेत्रातून सांगण्यात येते. कोरोनासोबतच पूर्वीचे आजार बळावल्यामुळेही हे मृत्यू होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोरोनामुळे नागरिक भयभित असतानाच तसेच रुग्णांना मानसिक बळ देण्याची गरज असतानाच रुग्णालयातील उपचारांबाबत वेगवेगळी माहिती प्रसारित केली जात आहे.

अशाच प्रकारची चुकीची माहिती दिल्याचे सांगत भाजपचे नगरसेवक मनोज दुलम, शिवसेनेचे नेते रमेश परतानी, यांच्यासह अभिजीत धुमाळ (सर्व रा. नगर) यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस नाईक सोनावणे करत आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment