पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला; धरणांवर परिणाम होणार?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार बॅटिंग केल्यानंतर आता काहीशी विश्रांती घेतली आहे. परिणामी मुळा धरणात केवळ 4227 क्युसेकने आवक होत आहे.

मुळा धरणामध्ये पाण्याची आवक वाढत चालली आहे. या धरणाची २६ हजार दलघफू क्षमता आहे. मुळा धरणात ४२२७ क्युसेकने आवक होत आहे.

या धरणात काल (सोमवार) सायंकाळी ६ वाजता २३ हजार १३० दलघफू (८९ टक्के) साठा झाला होता. मागील 12 तासांत केवळ 243 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले.

दरम्यान, भंडारदरा पाणलोटातही पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे धरणात येणारी नवीन पाण्याची आवक मंदावली आहे. गत 12 तासांत केवळ 116 दलघफू पाणी दाखल झाले.

त्यामुळे विसर्ग कमी धरण्यात आला असून तो सध्या 816 क्युसेकने सुरू आहे. धरणात काल सायंकाळी 10749 दलघफू पाणीसाठा होता.

निळवंडे धरणातही आवक कमी झाली आहे. निळवंडेतून केवळ 710 क्युसेकने प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. पाणलोटातून पाऊस गायब झाल्याने धरण भरण्याचा मुहूर्त लांबण्याची शक्यता आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment