धक्कादायक! ‘ह्या’ ठिकाणी कोट्यवधी रुपयांचे गौण खनिजाचे अवैध उत्खनन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- गौण खनिज ही एक राष्ट्राची संपत्ती आहे. याचे उत्खनन व वापर करताना शासन, प्रशासनाची परवानगी आवश्यक आहे. 

परंतु नेवासा तालुक्यामधील मोरयाचिंचोरा परिसरातून बेकायदेशीररित्या हजारो ब्रास गौण खनिजाचे उत्खनन होत असल्याचा प्रकार समोर आला असून प्रशासन यावर कारवाई करत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शासनाचा महसूल बुडवून दिवसाढवळ्या बेकायदेशीर डम्पर, ट्रॅक्टरमधून दररोज हजारो ब्रास मुरूम उत्खनन करून त्याचे मनमानी पैसे घेऊन कुठलेही रेकॉर्ड न करता सर्रासपणे विकले जात असल्याची  चर्चा आहे.

महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचे या अवैध मुरुमाकडे दुर्लक्ष होत असल्याचेही सांगण्यात येत आहे. अर्धा नेवासा तालुका तसेच पांढरीपूल एमआयडीसी व राहुरी तालुक्याच्या काही भागात मुरूमाची खुलेआम वाहतूक होत आहे.

अगदी परवानाधारक वाहनांप्रमाणे ही मुरुमाची वाहने मुख्य रस्त्यावर भरधाव वेगाने बेकायदा मुरूम वाहतूक करीत असताना त्यांना तलाठी,

पोलीस अगर कुठलीही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून साधी विचारणा, तपासणी अगर काहीच कारवाई केली जात नसल्याचे सोनई, धनगरवाडी, चिंचोरा,

चेडगाव, कात्रड येथील ग्रामस्थांकडून बोलले जात आहे. याठिकाणी महसूल विभागाने व्यवस्थित पाहणी करत कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment