अहमदनगरच्या महापौरांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितले दहा कोटी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. दहा हजारांचा आकडा रुग्णसंख्येने पार केला आहे. ग्रामीण भागातही हा आजार फोफावत चालला आहे.

यात अहमदनगर शहर कोरोनाचे हॉटस्पॉटच जणू बनले आहे. शहरातील रुग्णांची संख्या आता जास्त होऊ लागली आहे. त्यामुळे अहमदनगर शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून सध्या महापालिकेचे आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत बंद आहेत.

एकीकडे वाढते रुग्ण आणि महापालिकेचे घटलेले उत्पन्न याचा मेळ घालणे अवघड झाले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी दहा कोटी रुपयांचा निधी द्या,

अशी मागणी नगरचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे केली आहे. वाकळे यांनी तसे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे.

महापौरांच्या या कृतीमुळे महापालिका आर्थिक अडचणीत आली आहे का, असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. या पत्रात महापौरांनी म्हटले आहे की, नगरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.

महापालिकेने रुग्णांच्या उपचारासाठी तीन कोविड सेंटर सुरू केले आहेत. परंतु वाढती रुग्णसंख्या पाहता आणखी कोविड सेंटरची आवश्यकता भासणार आहे.

यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. सध्या महापालिकेचे आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत बंद आहे. त्यामुळे सरकारकडून कोविड रुग्णांच्या उपचारासाठी जो निधी प्राप्त झाला आहे, त्यामधून नगर महापालिकेला दहा कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्यास शहरातील कोविड रुग्णांवर उपचार करणे सोयीचे होईल.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment