Ahmednagar News

अहमदनगर महापालिकेची `ही` मागणी हस्यास्पद

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-  जिल्ह्यात नगर शहरात सर्वाधिक कोरोनाचे पेशंट सापडले आहेत. महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे कोरोनाबाधित रुग्णाचे हाल होत आहेत. आरोग्य विभागात देखील सावळा गोंधळ आहे.

नगरच्या महापौरांनी जिल्हाधिकाऱ्यांना ‘कोविड हॉस्पिटल’ उभारण्यासाठी दहा कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती आहे. यावरून कम्युनिस्ट पक्षाने मनपा आयुक्तांना सवाल केला आहे. सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेने लोकसहभागातून ‘कोविड हॉस्पिटल’ सुरू केले आहे.

तसे अहमदनगर महापालिकेला का शक्य होत नाही, असा सवाल भारतीय कम्युनिस्ट पक्षाने मनपा आयुक्तांना केला आहे. यासाठी सरकारकडून दहा कोटी रुपये मागण्यापेक्षा सांगलीचा आदर्श आणि मार्गदर्शन घेऊन काम करावे, असा सल्लाही देण्यात आला आहे. सांगली महापालिकेने लोकसहभागातून कोविड हॉस्पिटल उभारल्याची बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

त्यावेळी नगरच्या महापौरांनी जिल्हाधिकाऱ्यांना असे हॉस्पिटल उभारण्यासाठी दहा कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती आहे. महापौरांकडून केल्या जाणाऱ्या या मागणीवर काही संघटनांनी टीकाही केली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर सेक्रेटरी भैरवनाथ वाकळे यांनी मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना प्रश्न उपस्थित केला असून

मिळालेल्या पैशाचा अपव्यय होण्याची शंकाही उपस्थित केली आहे. मनपाची ही मागणी हस्यास्पद असून करोना संकटात महापालिकेच्या आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार उघड झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. करोना संकटकाळात आरोग्याधिकारी काही दिवस गुन्हा दाखल झाल्याने बेपत्ता होते.

आरोग्यविभागाचा कोट्यावधींचा कचराघोटाळा नागरिकांमधे आजही चर्चेचा विषय आहे. मृतदेहांची विटंबना तर रोजच ठरलेली आहे काय असे वाटते. या विभागाच्या कारभाराचा पूर्वइतिहास आणि पध्दत पाहिली तर १० कोटी रुपयांचे काय होईल हे चित्र आजच समोर येत आहे.

त्यामुळे हॉस्पिटलच्या नावाने पैसे मागून त्यांचा असा उपयोग होणे योग्य नाही. त्यापेक्षा लोकसभागातून हॉस्पिटलसाठी प्रयत्न करावेत, असेही भाकपने म्हटले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button